
हृदयाचे बंधन
PRO & Creator Features
Unlock Studio tools with Pro or Creator: remix and covers, photo covers, unlimited variations, edit sections and stem separation. Creator adds voice clone and lossless FLAC.
Remix / Cover
Pro & Creator
Voice Clone
Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
[Intro]
आई...
आज काही मागायचं नाही तुझ्याकडे,
आज फक्त काही सांगायचं आहे...
कधी बोलता आलं नाही,
ते आज शब्दांत मांडायचं आहे...
तू आहेस म्हणून आम्ही आहोत,
आणि आम्ही आहोत, कारण तू आहेस...
[Verse 1]
म्रित्यूच्या दारातून परत आलीस,
आम्हाला या जगात आणण्यासाठी,
स्वतःच्या वेदना विसरून गेलीस,
आमच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी...
स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवलीस,
आमची स्वप्नं सजवण्यासाठी,
किती वादळं अंगावर घेतलीस,
आमच्या वाटेवर फुलं अंथरण्यासाठी...
तुझ्या डोळ्यांत दुःख लपलेलं,
ओठांवर मात्र हसू असतं,
आम्ही सुखात आहोत ना आई,
बस्स... एवढंच तुला हवं असतं...
[Chorus]
आई... आई... तूच माझं जग आहेस,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे...
कितीही जन्म मिळाले तरी,
तुझ्याच पदराची सावली हवी आहे...
आई... आई... तुझं रिण कसं फेडू?
तुझ्या प्रेमाला कोणत्या शब्दांत मांडू?
देवाकडे एकच मागणं मागेन,
प्रत्येक जन्मी तुझाच मुलगा होऊन येईन...
[Verse 2]
आम्ही जेवलो नाही तर,
तुझ्या घशाखाली घास उतरत नाही,
आमच्या डोळ्यांत अश्रू आले,
तर तुझं मनसुद्धा हसत नाही...
आमच्या प्रत्येक चुकीला,
तू पदराआड लपवलंस,
जगाच्या प्रत्येक वादळाशी,
तू एकटीने युद्ध केलंस...
कधी आई झालीस, कधी बाबा,
कधी मैत्रीण बनून राहिलीस,
आम्ही हरलो जेव्हा आयुष्यात,
तेव्हा तूच आमची ढाल झालीस...
[Chorus]
आई... आई... तूच माझं जग आहेस,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे...
कितीही जन्म मिळाले तरी,
तुझ्याच पदराची सावली हवी आहे...
आई... आई... तुझं रिण कसं फेडू?
तुझ्या प्रेमाला कोणत्या शब्दांत मांडू?
देवाकडे एकच मागणं मागेन,
प्रत्येक जन्मी तुझाच मुलगा होऊन येईन...
[Verse 3]
कधी जग म्हणालं, आम्ही वाया जाऊ,
कधी काळाने परीक्षा घेतली,
पण तुझ्या संस्कारांच्या बळावर,
आम्ही प्रत्येक लढाई जिंकली...
आज आमच्या नावापुढे,
तुझ्या नावाचा अभिमान आहे,
लोक म्हणतात, चांगली मुलं आहेत,
पण त्यामागे तुझंच योगदान आहे...
आम्हाला मोठं करताना,
तू कितीदा स्वतःला हरवून गेलीस,
आमच्या उद्याच्या स्वप्नांसाठी,
तू तुझा आज विसरून गेलीस...
[मध्यांतर – अतिशय शांत, बोलल्यासारखे]
आई...
एक गोष्ट मनाला खूप लागते...
आज मोठे झालो आम्ही,
पण अजूनही तुझी स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही...
कधी तुझ्या डोळ्यांतलं समाधान पाहायचं आहे,
कधी तुला अभिमानाने हसताना पाहायचं आहे...
कधी तुला सांगायचं आहे,
की आई... आता तू थकली असशील,
आता थोडं जग स्वतःसाठी,
तुझ्यासाठी आम्ही आहोत...
आणि कधी नकळत तुला दुखावलं असेल,
तर तुझ्या लेकरांना माफ कर...
[Verse 4]
कितीही मोठे झालो तरी,
तुझ्यापेक्षा मोठे होणार नाही,
तुझ्या मायेच्या सावलीशिवाय,
आम्हाला दुसरं घर सापडणार नाही...
तूच मंदिर, तूच प्रार्थन