Back to home
Echoes of Yesterday
Singer-Songwriter

Echoes of Yesterday

Dr.Ramesh GandhiDr.Ramesh Gandhi
0 likes1 plays4:25
Style: Soulful vocals, Melodic, Ambient pads, male vocal, piano, flute, nostalgic
Learn to sing thisKaraoke with live pitch — get a score on every lineSing →

PRO & Creator Features

Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Photo Covers, LoRA) or Creator (Voice Clone, Variations, Edit Sections, Stem Separation).

Audio2Audio Remix

Pro & Creator

Voice Clone

Creator

Create Variations

Creator only

Edit Sections

Creator only

Stem Separation

Creator only

Lyrics

▶ Play this song to follow along.

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते,

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते,

जस कोनी वावरातुन उभ पिक चोरून नेते .

जस कोनी वावरातुन उभ पिक चोरून नेते.

गावातल्या गल्यां मंधून दिवस भर हिंडा-च,

दोस्त गडी भेटले की खेय आपला मांडा-च,

लहान सहान गोष्टीवरून रोज आम्ही भांडा-च,

गावातल्या गल्या गेल्या, भांडाले ना- कोनी येते,

गावातल्या गल्या गेल्या, भांडाले ना- कोनी येते,

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते ।

मास्तर माह्या शायेचे छडी घेऊन-च बसे,

माय बी घरी माही चांगली परेड घेत असे,

पो-ट्ट कोणत्या वर्गात हाये बापाले माहीत नसे,

शायेच्या नावान पोटात अजूनही गोया येते,

शायेच्या नावान पोटात अजूनही गोया येते,

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते.

गावात जवा लगन राहे माही राहे मजा,

वेटायातले सगये तिथं जमलेच समजा,

मस्त-पैकी जेवन करो ,घरी जाऊन निजा,

आता जेवन धकत नाही, झोप मले भेते,

आता जेवन धकत नाही, झोप मले भेते,

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते ।

शिकासाठी गाव सोडल, शहर माहय झाल,

अन पोटासाठी जिवाच रान म्या केल,

घानीच्या बैलावानी-च वय माह्य गेल,

केस कवा पांढरे झाले, अंधार डोया म्होर येते,

केस कवा पांढरे झाले, अंधार डोया म्होर येते,

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते ।

लगन झाल, पोर झााले, संसार माह्या रमला,

घर झालं, गाडी आली, थाट माह्या जमला,

सपनावानी दिवस गेले, खेय जसा रंगला,

अधून-मधून गावाले बी, माही फेरी होते,

अधून-मधून गावाले बी, माही फेरी होते,

वेय कसा पाखरा-वानी भुर्र-कन उडून जाते ।

Comments(0)

Sign in to join the conversation.

No comments yet. Be the first to comment!