
Golden Hour Breeze
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
[Chorus]
आज आनंदाचा दिवस आला,
सुखाचा सुगंध दरवळला,
पंचविशीच्या या सुंदर क्षणी,
अपूर्वासाठी आशीर्वादांचा वर्षाव झाला!
आमची लाडकी, आमची शान,
अपूर्वा तू घराचा अभिमान,
तुझ्या हास्याने फुलते घर सारे,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा हजारो!
[Verse 1]
लहानपणापासून हुशार तू भारी,
मेहनतीची तुझ्या कहाणी न्यारी,
प्रत्येक पावलावर जिद्द तुझी साथ,
यशाने उजळली तुझी जीवनवाट!
रिकामे बसणे तुला ना आवडे,
नवीन काही करण्याचे स्वप्न मनात फुले,
कर्त्रित्व तुझे असेच वाढत राहो,
सुख-सम्रिद्धीने जीवन बहरत राहो!
[Verse 2]
पॉलिटेक्निकचा टप्पा पार केला,
बी.टेकचा ध्यासही पूर्ण केला,
मेहनतीच्या बळावर स्वप्नांना पंख दिले,
यशाच्या आकाशात स्थान मिळविले!
आज नोकरीतही तू पुढे चालली,
स्वकर्त्रित्वाने नवी वाट घडविली,
तुझ्या यशाचा आम्हाला अभिमान,
अपूर्वा, तूच आमच्या जीवनाची शान!
[Verse 3]
घरातल्या प्रत्येकाची काळजी घेतेस,
प्रेमाने नाती मनापासून जपतेस,
स्वतःच्या कामात कितीही व्यस्त असली,
तरी परिवारासाठी नेहमीच उभी राहिली!
तुझ्या प्रेमाने घर आनंदी होते,
तुझ्या हसण्याने दुःख दूर पळते,
देवाकडे एवढीच प्रार्थना आमची,
सुखाने भरावी प्रत्येक वाट तुझी!
[Verse 4]
पंचवीस वर्षांचा सुंदर प्रवास,
नव्या स्वप्नांचा घेऊन सुवास,
यशाचे शिखर तू असेच गाठावे,
आनंदाचे क्षण आयुष्यात यावे!
नाव तुझे सदैव उजळत राहो,
मनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,
निरोगी आयुष्य, सुखाचा संसार,
तुझ्यावर राहो आशीर्वादांचा वर्षाव अपार!
समारोप – वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅपी बर्थडे, अपूर्वा राणी,
तू आमच्या घरची गोड कहाणी,
पंचविशीच्या या मंगल दिनी,
सुखी राहा तू प्रत्येक क्षणी!
आई-बाबांच्या प्रेमाचा आशीर्वाद,
तुझ्या आयुष्यात नांदो आनंद,
आमची लाडकी, आमची शान,
अपूर्वा, तूच आमचा अभिमान!