
Manatlya Manat Manatlya Manat
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
नाते तुझे नि माझे,
हे काव्य भावनांचे,
विस्तीर्ण या नभाला,
रूप लाभले तयांचे ||ध्रि||
तू सांजवेळ झाली,
मी प्रहर जाहलो रे.
तुझ्याच पावलांनी,
घरट्यात चाललो रे.
चित्तात कोरले गा,
क्षण रेशमी सुखांचे ||एक||
तू चांदणे सुगंधी,
मी रात्र धुंद आहे,
तुजवीण या नभाला,
व्यापून तिमिर घेते.
मनी वेध लागले रे,
सखे तुझ्या प्रीतीचे ||दो||
तू ध्यास अंतरीचा,
तू श्वास जीवनाचा.
हा सोहळा सुखाचा,
आपल्याच मीलनाचा.
मज वाटते आताशा,
हे बंध रेशमाचे ||तीन||
गर्दीत या नभाच्या,
तू एकटीच खास,
भोवती तुझ्या हा,
फिरतोय चंद्र श्वास.
तो गीत गात आहे,
आपल्याच मिलनाचे ||चार||
नाते तुझे नि माझे,
हे काव्य भावनांचे,
विस्तीर्ण या नभाला,
रूप लाभले तयांचे ||ध्रि||