
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
आयुष्याचे गाणे गाता क्षणभर तुला आठवावे.
पुन्हा नव्याने तुला एकदा डोळ्यात साठवावे
तो भोळा निरझर त्या पाऊल वाटा आणिक ते शहारे
त्या पाण्या मधल्या नितळ प्रतिमा तरंगासवे झुलावे
पुन्हा नव्याने तूला एकदा डोळ्यात साठवावे
आयुष्याचे गाणे गाता क्षणभर तुला आठवावे.
ते रुसवे फुगवे चोरून पाहणे ओंजळीत धरावे
विलगणे बिलगणे कुशीत येणे सारे सारे स्मरावे
पुन्हा नव्याने तूला एकदा डोळ्यात साठवावे
आयुष्याचे गाणे गाता क्षणभर तुला आठवावे.
हे रूप गोजिरे लोभसवाणे जणू कुसुम केतकीचे
होऊन भ्रमर मी तुझ्याच भोवती किती घुटमळावे
पुन्हा नव्याने तुला एकदा डोळ्यात साठवावे
आयुष्याचे गाणे गाता क्षणभर तुला आठवावे.
पुन्हा नव्याने तुला एकदा डोळ्यात साठवावे