Back to home
Manat Phulani Priti
Acoustic

Manat Phulani Priti

Tejasvini KaleTejasvini Kale
0 likes0 plays3:27
Style: Sweet, melodious Indian female playback singing voice, romantic Marathi Bollywood love song, soft and emotional, expressive vocals, gentle piano and acoustic guitar. Do not imitate any specific real singer., female vocal, romantic, drums, guitar, piano
Learn to sing thisKaraoke with live pitch — get a score on every lineSing →

PRO & Creator Features

Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).

Audio2Audio Remix

Pro & Creator

Voice Clone

Pro & Creator

Create Variations

Creator only

Edit Sections

Creator only

Stem Separation

Creator only

Lyrics

▶ Play this song to follow along.

Teju Atul — Our First Anniversary Song

[Chorus]

तुझ्यातच माझं जग सापडलं,

तुझ्या प्रेमात मन हरवलं...

अन ओळखीचं नातं हळूहळू,

माझ्या काळजाच्या जवळ आलं...

तू माझा अतुल, मी तुझी तेजू,

आपली जोडी अशीच राहो...

प्रत्येक जन्मी तूच मिळावा,

आपलं प्रेम असंच फुलत राहो...

[Verse]

Arrange Marriage च्या त्या वाटेवर,

पहिल्यांदा तू मला पाहायला आलास...

मग आपलं लग्न जेव्हा ठरलं,

माझा नंबर भावाकडून घेतलास...

पहिल्यांदा फोनवर बोलताना,

गप्पा होत्या अगदी साध्या...

पण माझ्या मनात काहीतरी झालं,

भावना उमलल्या प्रेमाच्या हळव्या...

तेव्हा कुठे ठाऊक होतं मला,

तू इतका जवळचा होशील...

एका साध्याशा फोनमधून,

माझ्या ह्रिदयाचा ठोका होशील...

[Chorus]

तुझ्यातच माझं जग सापडलं,

तुझ्या प्रेमात मन हरवलं...

त्या पहिल्या फोनपासून आजपर्यंत,

तुझ्यावरचं प्रेम वाढत गेलं...

तू माझा अतुल, मी तुझी तेजू,

आपली जोडी अशीच राहो...

प्रत्येक जन्मी तूच मिळावा,

आपलं प्रेम असंच फुलत राहो...

[Verse]

लग्नानंतरची ती पहिली सफर,

पेन्चच्या जंगलात आपण गेलो...

वाघाला पाहण्याची होती उत्सुकता,

पण एकही वाघ नाही दिसला...

वाघ जरी त्या दिवशी दिसला नाही,

तरी सुंदर क्षण आपल्याला मिळाले...

त्या तीन-चार दिवसांच्या सहवासात,

एकमेकांना आणखी जवळून जाणले...

गप्पा, सोबत, तो वेळ आपला,

मनात आठवणी बनून राहिला...

वाघ नाही दिसला जंगलामध्ये,

पण माझा जीव तुझ्यात गुंतत गेला...

[Verse]

मग पुण्यात आलो आपण दोघं,

पवना कॅम्पला फिरायला गेलो...

त्या टेंटमध्ये सोबत राहताना,

आणखी सुंदर क्षण जगलो...

अशा कितीतरी छोट्या आठवणी,

माझ्या मनात जपून ठेवल्या...

तुझ्या सोबतीचे ते दिवस सारे,

माझ्या प्रेमाच्या वहीत लिहिले...

महागड्या भेटी नकोत मला,

नको जगभर फिरण्याची आस...

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण,

माझ्यासाठी असतो खास...

[Verse]

कधी म्हणतोस मला “बाळा”,

कधी प्रेमाने “पिल्लू” म्हणतोस...

लहान बाळासारखी काळजी घेऊन,

माझे सारे हट्ट पुरवतोस...

माझ्या प्रत्येक छोट्या इच्छेला,

तू प्रेमाने होकार देतोस...

मी जेवण नीट करत नाही जेव्हा,

तेव्हाच मात्र रागावतोस...

तुझ्या त्या रागातही प्रेम असतं,

माझ्यासाठीची काळजी असते...

तू जवळ असलास की साजणा,

मनाला वेगळीच शांतता मिळते...

[Verse]

तू सगळ्यांची काळजी घेतोस,

कुणालाही मदत करायला नाही म्हणत नाहीस...

कुटुंब असो वा मित्र आपले,

सगळ्यांचा आदर करायला विसरत नाहीस...

पण माझ्या मनात एक तक्रार आहे,

ती आज तुला सांगायची आहे...

दुसऱ्यांची काळजी घेताना,

स्वतःची काळजी कुठे हरवते आहे?

माझ्यासाठी तू खूप खास आहेस,

तुझं हसणं मला प्रिय आहे...

तूही स्वतःला जपावंस,

एवढीच माझी प्रेमाची विनंती आहे...

जगासाठी तू आधार असशील,

पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस...

तू आनंदी, निरोगी राहावंस,

हेच माझं प्रेमाचं मागणं आहे...

[Bridge]

प

Comments(0)

Sign in to join the conversation.

No comments yet. Be the first to comment!