
Piano Bass Sunrise
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
आई पद्मावती माऊली,
आंबळ्याची माय...
तुझ्यावरती विश्वास माझा,
कधीच तुटणार नाही...
पद्मावतीच्या नावानं,
चांगभलं... चांगभलं...
आंबळे गावच्या आईच्या नावानं,
चांगभलं... चांगभलं...
कडक तुझा दरबार आई,
चुकलं तर सांगतेस...
पण संकटात लेकरांसाठी,
धावून येतेस...
मनापासून जो तुला पुकारे,
त्याला सोडत नाहीस...
भक्ताच्या मनात विश्वास ठेवुनी,
पाठीशी उभी राहतेस...
कळगंगेच्या काठी आई,
जाग्रित तुझं स्थान...
मंगळवारी दर्शनासाठी,
येतं सगळं गाव...
नवस करतो, उपवास धरतो,
तुझ्या चरणी येतो...
आई माझी सोबत आहे,
हा विश्वास ठेवतो...
जत्रा आली आंबळ्यामध्ये,
गाव सगळं सजतं...
काठी पुढं, पालखी मागं,
गुलालामध्ये रंगतं...
ढोल ताशांचा नाद घुमतो,
आईचा जयजयकार होतो...
पद्मावतीच्या नावानं,
सगळं आंबळं चांगभलं म्हणतं...
पद्मावतीच्या नावानं,
चांगभलं... चांगभलं...
आई पद्मावती माऊली,
चांगभलं... चांगभलं...
आई पद्मावती माऊली,
आमची तूच माय...
आंबळे गावच्या लेकरांची,
राखण कर तू आई...
पद्मावतीच्या नावानं...
चांगभलं!
चांगभलं!
चांगभलं!