
Golden Hour Symphony
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
पहिल्यांदा तुला पाहिलं,
मग हळूहळू बोलणं सुरू झालं,
बोलण्यापासून मेसेजपर्यंत,
आणि मेसेजपासून मनातलं सांगणं सुरू झालं.
नोट्स शेअर करण्यापासून,
लांब लांब व्हिडिओ कॉलपर्यंत,
आणि त्या कॉलपासून,
समोरासमोरच्या भेटीपर्यंत.
एकत्र फिरणं, नवीन गोष्टी अनुभवणं,
प्रत्येक क्षणाला आठवण बनवणं,
कधी मनापासून हसणं,
कधी छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करणं.
असं करत करत,
अकरावीपासून आजपर्यंत आलो,
आणि कळलंच नाही,
कधी ही मैत्री इतकी खास झाली.
काही न बोलताही,
एकमेकांचं मन कळतं,
कितीही चढ-उतार आले,
तरी आपलं नातं तसंच राहतं.
तुझ्यासारखा मित्र मिळणं,
माझ्यासाठी खरंच नशीब आहे,
तू आहेस म्हणून,
हा प्रवास अजून सुंदर आहे.
प्रिय तेजस,
आज तुझा खास दिवस आहे,
मनापासून एकच इच्छा आहे,
तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद असावा,
प्रत्येक स्वप्नाला यश मिळावं,
आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू
कधीच कमी होऊ नये.
आजपर्यंतच्या प्रत्येक क्षणासाठी,
प्रत्येक आठवणीसाठी,
माझं न बोलताही समजून घेतल्याबद्दल,
आणि प्रत्येक वेळी साथ दिल्याबद्दल,
मनापासून धन्यवाद.
अकरावीपासून सुरू झालेला हा प्रवास,
असाच पुढेही चालत राहू दे,
अजून खूप भेटी,
खूप फिरणं,
खूप हसणं,
आणि खूप सुंदर आठवणी तयार होऊ दे.
आयुष्य कितीही बदललं,
आपण कुठेही असलो,
तरी आपली ही मैत्री
अशीच कायम राहू दे.
तुझी जिवलग मैत्रीण,
साक्षी.
प्रिय तेजस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
With lots of love,
Your Forever Friend, Sakshi.
Happy Birthday, Tejas!