
Dhol Tasha Visarjan Utsav
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
आज होत आहे तुझ्या विसर्जनाचा सोहळा,
अश्रू भरून पाहतोय माझा डोळा…
ओ गणराया… ओ गणराया…
दहा दिवसांचा पाहुणा,
आज निघाला आमचा राजा!
आला होतास आमच्या मंडळात,
आनंद भरलास प्रत्येक मनात,
सकाळ-संध्याकाळ तुझाच गजर,
तुझ्या नावाने दुमदुमला परिसर!
आज निरोपाची वेळ आली,
मोरयाच्या गजरात मिरवणूक निघाली,
डोळ्यात अश्रू, मनात प्रेम,
बाप्पा तुझ्याविना वाटेल सगळं कमी!
नाचूया रे! नाचूया रे!
बाप्पासाठी नाचूया रे!
ढोल वाजला — धुम धुम धुम!
ताशा वाजला — धड धड धड!
हात वरती — मोरया!
पाय थिरकवा — मोरया!
गोल गोल फिरा — मोरया!
जोरात बोला — मोरया!
गणपती बाप्पा — मोरया!
मंगलमूर्ती — मोरया!
पुढच्या वर्षी — लवकर या!
गणराया — लवकर या!
आज बाप्पासाठी नाचायचं!
नाचत नाचत निरोप द्यायचा!
फुलांनी सजली बाप्पाची स्वारी,
आज दिसते किती सुंदर भारी,
दिव्यांची आरास, फुलांची माळ,
बाप्पासाठी सजला मंडप विशाल!
लहान-मोठे सारे आले,
बाप्पासाठी एकत्र झाले,
कोणी नाचे, कोणी गाते,
सगळे तुझ्या तालावर थिरकते!
ढोल-ताशांचा नाद घुमला,
मोरयाचा जयघोष झाला,
मंडळाच्या या अंगणातून,
आज गणराया निरोपाला निघाला!
डावा पाय — धुम!
उजवा पाय — धुम!
दोन्ही हात वर — मोरया!
एक फेरी — मोरया!
दोन फेरी — मोरया!
सगळे मिळून — मोरया!
धुम ताशा धुम ताशा,
आज रंगली बाप्पाची भाषा!
ढोल ताशा कडकड वाजे,
मोरयाच्या तालावर गाव नाचे!
अरे नाचा रे नाचा!
मनसोक्त नाचा!
आजचा दिवस बाप्पाचा,
जोरात नाचा!
दहा दिवस तू सोबत होतास,
हसता हसता मन जिंकलंस,
आरतीच्या त्या मंगल स्वरांनी,
आनंद भरलास प्रत्येक मनामध्ये!
आला होतास पाहुणा बनुनी,
राहिलास आमचा आपलासा होऊनी,
तुझ्या क्रिपेने उत्सव रंगला,
तुझ्या नावाने परिसर दुमदुमला!
आज जातोयस तू तुझ्या घरी,
आठवण राहील मनामध्ये सारी,
एकच इच्छा मनापासुनी,
लवकर ये पुन्हा आमच्या मंडळात गणराया!
थांबा जरा…!
ढोल वाजू दे!
ताशांचा आवाज वाढू दे!
तीन… दो… एक…
मोरयाssssssss!
नाच! नाच! नाच रे!
गणरायाच्या नावाने नाच रे!
हात वर करून नाच रे!
गोल गोल फिरून नाच रे!
धुम धुम ढोल!
धड धड ताशा!
मोरया मोरया!
दुमदुमला रस्ता!
मोरया! — मोरया!
गणराया! — मोरया!
सगळे मिळून! — मोरया!
आज जातोयस तुझ्या घरी,
निरोप देताना भरून आली नजर सारी,
तू जरी आज दूर जातोस,
आमच्या ह्रिदयात कायम राहतोस!
अश्रू आले डोळ्यांमध्ये,
पण आनंद आहे मनामध्ये,
निरोप देतो तुला प्रेमाने,
पुन्हा ये रे गणराया आमच्या मंडळामध्ये!
येशील ना लवकर, पुढच्या वर्षी?
जास्त वाट पाहू देऊ नकोस रे गणराया!
तुझ्या आगमनाची वाट पाहू,
मंडळ पुन्हा तुझ्यासाठी सजवू,
फुलांची आरास, दिव्यांची माळ,
पुन्हा सजवू तुझ्यासाठी मंडप �