
Mangalmay Aarti
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥ ध्रु. ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजडित मुगुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥ ध्रु. ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें, निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥ ध्रु. ।।
ओवाळा ओवाळा माझ्या
सद्गुरू राणा
माझ्या सावळ्या राणा
पाचा ही तत्वांच्या
ज्योती लावल्या ध्याना
निराकार वस्तू कैसी
आकारा आली ,
कैसी आकारा आली
सर्वाघटी व्यापक
माझी सद्गुरू माउली
सोळा सहस्त्र बाहत्तर कोठड्या
काया रचिली
हरीने काया रचिली
नउ खिडक्यांचा जोड
आत मूर्ती बैसविली
सप्त ही सागरांचा वेढा
कैसा घातला ,
वेढा कैसा घातला
तुका म्हणे बाप
माझा कनवाळू आला
अखंड ओवाळा ओवाळा
माझ्या सद्गुरू राणा
माझ्या सावळ्या राणा
पाचाही तत्वांच्या ज्योती
लावल्या ध्याना
कर्पूरगौरं करुणावतारं ।
संसारसारं भुजगेन्द्रहारं ॥
सदा वसंतं हृदयारविंदे ।
भवं भवानीसहितं नमामि ॥
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥